Thursday, May 31, 2012

कलीयुगाची सुरवात

महाभारताचा अकरावा खंड वाचताना, एका ठिकाणी अडखळलो. मृत्यूशय्येवरील पहुडलेल्या भीष्मांनी पांडवांना केलेल्या उपदेशात कलीयुगाच्या खुणांबद्दल सांगितले आहे. त्यात मुली जन्मताच गर्भधारणा योग्य जन्माला येतील असे लिहिले आहे. आणि विचार करता मानवाने कलियुगाला कसे आमंत्रण देऊ केले आहे हे कोडेही उलगुडू लागले. शहरातील मुलींचा विचार करता त्यांचे वयात येण्याचे प्रमाण सातव्या आठव्या वर्षीच दिसून येते. एका शिक्षिकेने सांगितलेली गोष्ट विचार करायला लावणारी आहे. ती म्हणते मुली आपले बालपण हरवून बसत आहेत. वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासूनची बंधने कशी आणि कोणी समजवायची? हे प्रमाण शहरात जास्त दिसून येते. कारण शोधायचा प्रयत्न केला ते प्रत्येक गोष्टीचे होणाऱ्या औद्योगिकीकरण ह्याच विषयात सामाविले आहे. शहरातील वस्ती वाढल्यावर अनेक वस्तुंचा पुरवठा एक गठ्ठा होऊ लागला. दुधाच्या मोठ्या मागणीमुळे आरे, आणंद, अमूल, महानंदा, वारणा सारखे अनेक दुग्धुद्योग नावारुपास आले. अनेक गाई म्हशींचे तबेले उदयास आले. ह्यात गाई म्हशीच्या तुलनेत बैल व रेड्यांची संख्या नगण्य राहू लागली. गाई म्हशींची गर्भाधारण कृत्रीम रेतनद्वारे म्हणजेच इंजेक्शन द्वारे केले जाऊ लागले. ह्या करणामुळे गाई म्हशीं चा लैगीक कोंडमारा होऊ लागला व त्याच्या शरीरातून दुधामध्ये स्त्रीत्वाची जास्त स्त्रावके उतरू लागली. हे दुध प्यायल्या मुळेच मुलींचे वयात लवकर येणे सुरु झाले असावे. कारण गावातून जेथे पिशवीतील दुधाचा वापर कमी आहे, अथवा गाई म्हशी मधील कृत्रीम गर्भधारणा प्रमाण कमी आहे तेथे हा प्रश्न आज कमी आहे. ह्या दुधामुळे मुलींवर परिणाम होतो तसाच तो मुलांवरही होतो. स्त्री स्त्रावाकाम्मुळे मुलांमधील स्पर्मची संख्या घटू लागली आहे. एवढेच नव्हे तर मुलांचे भिन्न लिंगाबद्दलचे आकर्षण कमी होत असून सम लैगीक साम्बधाकडे होणारे आकर्षण ह्याचाच परिणाम तर नसेल ना? मोठ्या शहरातील वाढती गे संख्या ह्याचाच परि पाक नाही ना? माझे विचार Without Statistics Hypothesis असेल कदाचित, पण जाणत्यांनी ह्या गोष्टीचा विचार जरूर करावा. पशुवैद्यक तसेच मानव वंश शास्त्रावर अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी ह्या गोष्टीचा अभ्यास करणे आवश्यक आहे असे मला वाटते

Saturday, September 25, 2010

नमस्कार,
भरपूर दिवसांनी ब्लॉगवर लिहिण्याचा योग आला आहे, दररोज इ मेल पाहिल्यावर कहीतरी लिहावे असे वाटते, पण कळलं तरी वळत नाही! आळसाचा प्रभाव, क्रियात्मकतेला पुढे येउच देत नाही, हेच खरे!!
भारतीय राजकारणातही अशीच मरगळ आलेय, आळस साचलाय आणि म्हणूनच शरद पवार, सुरेश कलमाडी, नारायण राणे या सारख्या नेत्यानी देखिल ताळतंत्र सोडलय, असच वाटतय!
महागाई वर कोणतेही उत्तर न सापडलेले पवार साहेब आता कर्जमाफ़ी नाही असे ऒरडू लागले आहेत, गेली कर्ज माफ़ी काय शेतक-याच्या भल्यासाठी दिली होतीत, निवडणूकीतील कार्यकर्त्यांची कर्जे शासनदरबारातून माफ़ करण्याचा डाव साधलात, कर्जमाफ़ीमुळे शेतक-याच्या आत्महत्येमधे कोणताही फरक पडलेला नाही. शेतक-यांच्या आत्म्हत्येमागे त्यांची कमी होणारी उत्पादकता हे महत्वाचे कारण आहे, आणि जोपर्यंत त्या गोष्टी कडे लक्ष दिले जात नाही, तो पर्यंत हे सरकारी खून सूरूच राहतील. शेतक-याला कर्जमाफ़ीचे सलाईन नको आहे, वेगेवेगळ्या सबसीडींचे गाजरही नको आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या, दलाल, अडते, साठेबाज,सरकारी खरेदी विक्री, निर्यातदार ह्यांचा वेठबिगारातून त्याला स्वच्छ कारभाराचा दिलासा दिलात तरी पुरे झाले. कृषी उत्पन्न बाजार समित्यामधे राजकिय पक्षाचे कार्यकर्ते फक्त वसूली करण्यासाठीच सहभाग घेतात, त्यांना वाटून दिलेली ती कुरणे आहेत. गेल्या वर्षी उसाचे गाळप झाल्यावर वाढलेले साखरेचे भाव, फक्त साखर कारखानदारांचा व संबंधीत राजकारण्यांनी परिस्थितीचा फायदा कसा उठविला जाउ शकतो, ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. १५रू किलोची साखर शेतक-याला वाढिव पैसा न देता चाळिस रूपये किलोने कशी विकली जाउ शकते, ही राजकारणी चाल सर्वसामान्य जनतेला समजणे कठीण आहे.
सुरेश कलमाडींनी राष्ट्रकूल स्पर्धा आयोजनेतील केलेला भ्रष्टाचार आता कॉंग्रेस नेत्यानाही किळसवाणा वाटू लागला आहे, आज मणिशंकर अय्यर ह्यांच्या मुलाखतीमध्ये हा भ्रष्टाचार साधरण पन्नास हजार कोटींचा असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. चार दिवसांनी बाबरी मशिद राम जन्मभूमी विवादातील पहिला न्यायालयातील निकाल अपेक्षित आहे. मात्र सरकारने अजूनही डोके ठिकाणावर असेल तर राष्ट्रकूल स्पर्धाच्या दरम्यान हा निकाल लाउ देउ नये. अर्थात सरकारला राष्ट्रकूल स्पर्धा आयोजनेतील केलेला भ्रष्टाचार सहज पचवायचा असेल तर राम जन्मभूमीचा निकाल जरूर लाऊन त्याला आंतरराष्ट्रिय मान्यता मिळवून द्यावी.
नारायण राण्यांनी आपल्या खूनी खासदार मूलाच्या पाठी उभे रहाताना केलेली कवायत केविलवाणी वाटली, राण्य़ांनी जन्मभर जे केले त्यांच्या घरात गांधीजींचा जन्म थोडाच होणार! कणकवली कुडाळ मधे दिवसा ढवळ्या केलेले व पचवलेले खून आता राजपूत्र करित आहे. ही लोकशाही आता भ्रष्टाचारामुळे कलंकीत झाली आहे. मी पुढे जाउन म्हणेन पूर्वी ह्या सर्व गोष्टींचा हक्क फक्त राजेशाहीला होता. एका राष्ट्रात एका राजघराण्यातील पाच पंचवीस नातेवाईक असा फायदा घेत असतीलही कदाचित! पण विक्रमादित्य, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त, हरिच्शंद्र, अशोक, शिवाजी महाराज, पेशवे, अहिल्याबाई अशा अनेक राजेशाहीत संस्कतीचा विकास झालेलाच दिसतो. चांगल्या राजेशाहीत झालेली प्रगती वादातीत उच्च दर्जाची होती. आज ओमान देशातील प्रगती ही चांगल्या राजेशाहीचा उत्तम नमुना आहे. टिळक आगरकर वादात आगरकर काही अर्थाने दूरदृष्टीचे होते असेच म्हणावे लागेल. लोकशाही मिळवण्याच्य़ा आधी जनता शहाणी करायला हवी हेच खरे! निरक्षर अज्ञानी जनतेच्या असाहय्यतेचा फायदा उठवून केलेले राज्य म्हणजे जंगल राजचा उत्तम नमुना ठरावा!

Saturday, February 13, 2010

मराठी मनाचा गोंधळ!

मराठी मनाचा गोंधळ!
काय झालय कोणास ठाउक, पण सर्वच मराठी राजकारण्यांचा गेला महिना फारच कठीण गेला. मुद्दा मुंबईचा असो किंवा महागाईचा ! शाहरूख खान चा असो किंवा झेंड्याचा ! सर्वांच्याच विचारांची गल्लत चालली आहे आणि सामान्य मनाची फरपट!
विधानसभेतील जय पराजय आता सर्वांच्याच पचनी पडले आहेत. अनपेक्षीत विजयाच्या नंतरही, आठ दिवसांची वेळ टळूनही न बनलेल्या मंत्रीमंडळाची गोष्ट आता विस्मरणात चालली आहे. निवडणूकीच्या खर्चाची ताळमेळ करण्यासाठी वाढवलेल्या साखरेच्या भावाची गोडी आता दूर सारणे, कठीण होत आहे, कारण आता नियंत्रण शरदरावांचे नसून ते व्यापारी बंधवांच्या हातात आहे. महागाईचा भडका अन्नमंत्री, अर्थमंत्री आणि स्वत: प्रधानमंत्री ह्याना समजेनासा झाला आहे. ह्यातच काही एक आवश्यकता नसलेले विधान अशोकराव त्यांच्या पोरकट भावाने करून गेले, “मुंबईत टॆक्सीवाले मराठीच असतील”! आणि हे वाक्य ऐकताच विजनवासात गेलेले उध्दवराव अचानक गुरगुरू लागले देखिल! अशोकरावांना एव्हाना आपण चुकीचा विषय हाताळत असल्याची जाणिव दिल्लीकरांनी करून दिली गेली असावी. कारण त्यांनी बोललेल्या वाक्याचा अर्थ चूकीचा लावला गेला अशी सारवासारव करायलाही ते विसरले नाहीत.
ह्या वादातच अवधूत गुप्त्यांचा झेंडा आणि शिक्षणाच्या आयचा…. ह्यावर मराठा मर्द गडी ज्यांचा शिक्षणाशी सूतराम संबंध नाही आणि नारायण राणे ह्याचे सुपुत्र सरसाऊन उठले. ह्यावेळी मात्र सरकारला विचारांचे स्वातंत्र्य आणि त्याला संरक्षण हे काही आठवले नाही. मात्र श्हारूख वादातून उठलेले वादळ शमविण्यासाठी अशोकरावांचे सरकार सरसावले आहे. ह्याच वादात नको असताना धर्मराजांची जागा घेणारे मोहनराव भागवत आणि माधव तसेच गडकरी देखील आपले मत देउन गेले. गेल्या आठवड्यातील राहूलची मुंबई भॆट गनीमीकावा सा्धून गेली आणि म्हणून मराठी मनाचा गोंधळ अधीकच विचित्र बनू लागला आहे. शिवाजी महाराजांची भवानी तलवार ब्रीटीशांनी नेली, पण गमीनी काव्याचे साफ़्टवेअर दिल्ली हाती लागल्याची खंत अधिक बोचरी आहे.
मुंबईत मराठी जोर कमी झाल्याची खंत आपणा सर्वाना असायलाच हवी, पण त्याही पेक्षा अधीक आवश्यक आहे ती आत्मपरिक्षणाची! मुंबईचा विकास करताना पारशी, गुजराथी बांधवांचे योगदान दूर करून चालणार नाही. कारखानदारी ह्या दोघानीच पेलेली होती. ह्या दोघांची चाकरी करण्यात आम्हाला धन्यता वाटली, ह्या नोकरीच्या स्पर्धेत पहिल्यांदा दाक्षिणात्य शिरले, त्यांना काबूत आणण्याचे काम शिवसेनेने निश्चित केले, पण त्यातून मराठी माणूस निश्चित शहाणा झालेला नाही. मनोहर जोशींच्या कोहिनूर मधून हजारो मराठी हातांना रोजगार मिळाला, पण मनोहररावांबरोबर आणखी कोणी टाटा बनले नाही. आमची कोठेही शाखा नाही हिच धन्यता आपण उगाळित राहिलो.
मराठी माणूस शिक्षणात कमी पडला असे मूळिच नाही. पण संशोधन व कारखानदारी ह्यात तो मूळीच छाप उठवू शकला नाही. एकही नोबेल मराठी नावासमोर न लागण्याइतके आपण षंढ आहोत काय? व्यापार, शेअर्स, उद्योग, कंत्राटदारी ह्यात आपण न उतरून तोटा करून घेत आहोत. आपण श्रमाच्या कामातही कमी पडत आहोत. फयान वादळात कोकणातील शेकडो जहाजे बूडुनही ह्या कानाचे त्या कानाला कळले नाही, कारण त्यावर काम करित मेलेले हजारो प्राण बिहारी व यूपी भय्यांचे होते. तुमच्या गावातील भंगार गोळा करायचे काम भय्या करतो, केळी व फळे तोच विकतो, बेक-या त्यांच्याच! काजू बी व्यापारही आता भय्यांच्याच हाती गेला आहे. गवंडी आणि टाईल्स काम तेच करतात, इतकेच कशाला मराठी नावे लावणा-या सलून मधील केस कापणारा न्हावी हा भय्याच असतो. स्वीट मार्ट एकजात राजस्थानी व युपी बय्यांची आहेत. कापड मार्केट, हार्ड्वेअर ईकडे आपण कधी बघीतलेच नाही. बिगारी काम कन्नड, तेलगू आणि उरिया लोकांच्या हाती गेले आहे. मोटर मेक‘एनिक व टायरवाले केरळी आहेत. परवा लग्नाला बोलावलेले भडजी देखील युपीचे होते. रेल्वे स्टेशनवरील एकही दूकान मराठी माणसाचे नाही. विमान उद्योगाची गोष्ट फ़ारच दूरची. हावरे, डिएस्के, पेठे, गाडगीळ, चितळे, किर्लोस्कर, गरवारे, नाईकनवरे एवढी दोनचार नावे मराठी झेण्डा फडकवीताना दिसतात, ह्यामध्ये हजार पटीने वाढ होणे आवश्यक आहे, तरच मराठी मन आणि नाव जिवंत राहील हेच निश्चित………

Saturday, December 20, 2008

वा-याची झुळुक

वा-याची झुळुक,
हालवीते वेल,
नादवीते झाड....गुदगुल्या!
वा-याची झुळुक,
नाजूक तरंग
तरीही अभंग.....जलाशय!
वा-याची झुळुक,
पारिजात सडा
सुगंधे भारिला....परिसर!
वा-याची झुळुक,
गाली बट खेळे,
कशी दूर करु.....नजरेने!
वा-याची झुळुक,
हेलावीते मन
हिंदोळा बनूनी.....आठवणी!
वा-याची झुळुक,
आनंद भरला,
पुरुनी उरला.....पानोपानी!!!!

Saturday, December 13, 2008

झालय कुठे काय?

२६ नोव्हेंबरला मुंबईतील दणका सर्व जगाला जाणवलाय, अमेरिका अस्वस्थ झाली, पाकिस्थान नेही कार्यवाही करू अशी दर्पोक्ती केली आहे. पण भारतातील जनता जनार्दनाला याची कितपत जाणिव झाली आहे कोणास ठाउक? दोन दिवसाच्या अथक कार्यवाही नंतर दहशतवादी मारले गेले. पण आपलं सगळं पितळ उघडं पाडून मेले.
दहशतवादापेक्षा अधिक महत्वाचे अंतर्गत रोगांनी आपल्याला ग्रासलय त्याकडेही पहाणे आवश्यक झालय.
भ्रष्टाचार हा तर एडस पेक्षा अति घातक, तो दहशतवादाला मदत करतोच, म्हणून तर दहशतवादी राजरोसपणे सर्व सीमांचे उल्लंघन करून सहजपणे कोठेही कोणत्याही शहरात राहू शकतात.
पंचतारांकित हाटेलात साध्या भारतीयाला हटकणारे भरपूर असतील, गरीबाला लांबूनही बघणे जीथे दुरापास्त तेथे दहशतवादी चार चार गोणी सामान काय एका दिवसात घेउन जाउ शकतात? तेथील सरदारी दरवानांचे हात आणि मुंडकी दिवसरात्र सलाम करून शौर्य काय असते ते विसरून गेले आहेत. टिप्स घेउन लाचार झालेले हात आता गुलाम झाले आहेत.भारतीय आदरातीथ्याच्या नावावर दरवानांचे मिशांचे झुपके फक्त देखल्या देवा सारखे उरलेत. दररोजचे हजारो लाखो रुपये घेउन धंदा करणा-या ह्या हाटेलना स्वत:ची सुरक्षा यंत्रणा कोणतीच नाही काय?
CST रेल्वे स्टेशन वर तर प्रवासींची झालेली हत्या तर फारच दयनीय होती. दोन दहशतवादी क्षणार्धात साठ सत्तर मुडदे पाडतात, आणि बाकी गर्दी काय शांती मंत्र म्हणत आपलं षंढत्व झाकतं! एक माईचा लाल ह्या गर्दीत न जन्मावा ह्याच फार वाईट वाटतं. दुस-याच्या दु:खाकडे आपल्या घाईच्या नावावर कानाडोळा करण्याची वृत्ती येथे धोका देउन गेली.
पंचवीस वर्षापूर्वीचा मला डोंबिवली स्टेशन मधिल प्रसंग आठवतोय. महिलांच्या डब्यातून एक गरोदर महिला उतरताना फ़लाटावर पडली, डब्यातील शंभरहून उतरलेल्या अगदी मध्यमवर्गी मराठमोळ्या महिला तीच्याकडे न बघता,ओलांडून स्टेशन मधून बाहेर पडत होत्या, डब्यात चढणा-या तीला ओलांडून चढल्या, हजारो पुरुष तेथून सटकले, पण एक जणही तीला मदत करायला धावला नाही. तीची पर्स व पिशवी उचलून मी त्या ताईंना बसवलं. त्यावेळी डोबिवली स्टेशन वर पिण्याचे पाणीही मिळले नाही, त्यावेळी बिस्लेरी मिळत नव्हत्या. पाच दहा मीनीटात स्वत:ला सावरून ती उभं रहाण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागली, एव्हाना फ़लाटावर पाच दहा महिला लेडिज ड्ब्याजवळ आल्या होत्या, तरीही कॊणी तीला उभ रहायला मदत केली नाही.लोक काय म्हणतील हे सर्व विसरून मी त्या ताईला उभ केलं. कुठ जायचय, चालवतय ना विचारून पिशवी पर्स घेतली व त्यांना हात धरून पूर्वेकडे रिक्षापर्यंत पोचविले. सांगायचा उद्देश एवढाच,वेळेला उपयोगी पडायचे नसेल तर जगायचं तरी कशाला? घाईच्या नावावर माणूसकी विसरत असाल तर भारतीय संस्कृतीचे गुण गायची मूळीच आवश्यकता नाही.
रेल्वेच्या एकाच डब्यात चार जणांची पाकीटे मारली जातात, एकाला पकडलं जातं. त्या पाकेटमाराचे सोबती त्याला मारायच नाटक करित खाली उतरतात आणि रेल्वे सुरु होताच हसत हसत परत आपल्या कामाला लागतात. ईतरांच्या दुःखाचा क्षणभर तरी विचार करायला हवाच! ह्या सगळ्याचा कहर म्हणजे हरविलेल्या पाकिटातील ड्रायव्हींग लायसेन्स मिळ्वून देण्यासाठी एका पोलिसांने एक हजार रुपये मागितले. जनतेचे रक्षकच जर चोरांचे सा्थीदार बनून जगत असतील तर बघायचे तरी कॊणाकडे?
नोकरशाही आणि लोकशाही यांनी एकमेकावर अंकूश ठेवला नाही आणि हातात हात घालून भ्रष्टाचार करू लागले तर देशाचे भविष्य जाणार तरी कोठे?
२६ नोव्हेंबरचा एपिसोड शिवराज पाील, आर आर आबा आणि विलास रावांचे बळी घेउन नूसताच थांबला नाही तर नारायणास्त्र नीकामी करून अशोकरावांची वर्णी लाऊन गेला. देशावरील संकटसमयात गृहमंत्री पदावर कोणीही नसताना, देशाचे संरक्षण मंत्री व परराष्ट्र मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडण्याचे हिजडचाळे चार दिवस करित होते.त्यांच्या पुरुषार्थाला साजेलसा निर्णय त्यांनी स्वतः न घेता परत दिल्लिला सोनियाचे दारी जाउन सोडवला.
ह्या सर्वावर कहर म्हणजे लोकसभेतील पाच खासदार अटॅक च्या वेळी ताज मधे उतरले होते. हे जनतेचे सेवक खासदार समितीच्या नावावर कोणत्या तरी कंपनीच्या लाचार कृपेने पंचतारांकीत हॉटेलात रहात होते. त्यातील जयसींगरावांची प्रतिक्रिया लाज आणणारी होती,जनता जळत असताना जयसींगराव लॅ्पटॉप वर इलेक्शन्चा प्रोग्रॅम ठरवीत होते. त्यांची ताज मधिल खातिरदारी चांगली होती हे सांगायलाही ते विसरले नाहीत. मढ्यावरचे लोणी खा्णा-या ह्या खासदारांना दहशतवाद्यांच्या आधी गोळ्या घालून मारायला हवे.
भाजपाच्या तोंडातील राजस्थान व दिल्लीचा घास कॉन्ग्रेसच्या मुखी लागला, दिल्ली व रा्जस्थान मधील मुस्लिमांची एक गठ्ठा मते कॉन्ग्रेसला मीळाली. बसपाची मते कमी झाली. हिंदूत्वाच्या नावावर गुजरात नको हिच भावना मुस्लिमांची असावी.
नारायण राण्यांचा नारोबा करण्याचा चान्स समग्र कॉन्ग्रेसवाल्यानी सोडला नाही. एका आमदाराची प्रतिक्रिया फारच बोलकी होती. लोकसभा निवडणूकीच्या आत नारायण राणे वेगळे पाडायचे हे समजूनच त्याना कॉन्ग्रेसमद्ये घेतले होते.ते बाहेर जातांना त्याच्याबरोबर कॉन्ग्रेसवाला कोणीही नसेल तर त्यानी आणलेले काही जण कॉन्ग्रेसमधेच रहातील. आणि घडतयही तसेच. नारायणराव आता माझ्या बोलण्याचा अर्थ असा नव्हता अ्सेही खुलासे करित आहेत.एकूण काय राण्य़ानी पांघरलेले वाघाचे कातडे उसवले.
शहिद पोलिसांना श्रद्धांजलीचे राजकारण सर्वच करित आहेत. केरळचे मुख्यमंत्री अच्युतानंदननी चटकन माफ़ी मागून पडदा पाडला. नरेन्द्र मोदींनी देउ केलेल्या एक कोटीवर विलासराव कोटी करायचे विसरले नाहीत, पण मदतीचा हात देताना आकडा फ़ुगलेला दिसला नाही.सा्ध्वीचे राजकारण करायला गेलेल्या ATS ला दहशतवाद्यांकडून चपराक मिळाली हे मात्र वाईट झाले.
शांतीमंत्राचे अनुसरण करणारी जनता, स्वतःची शक्ती ऒळखून प्रतिकार करायला वेळेवरच शिकली नाही तर स्वतःच्या घरी दारीच पानीपत घडतांना बघायला मिळेल. शारीरीक आ्णि मानसिक शक्तीची प्रतिष्ठापना प्रत्येक नागरिकाने करणे आवश्यक आहे. राष्ट्रिय स्वयंसेवक संघाने सेवा कार्याबरोबरच हे काम अधिक जोमाने करायला हवे. स्पर्धेच्या युगात संघ विद्यार्थी व युवकांना आकृष्ठ करण्यात अपूरा पडतोय हे मात्र खरे आहे. रामदेव बाबा,SSY,सहजयोग,रविशंकर किंवा आध्यात्माकडेही वेळप्रसंगी झुकणारा तरूण वर्ग राष्ट्रीय कार्यात उतरतांना उदासीन का? ह्याचे उत्तर शोधलेच पाहिजे.
जनता मनातून घाबरली असली तरी झालय कुठ काय? सारखं वागत परत कामाला लागलेली दिसत आहे.

Wednesday, November 5, 2008

निवडणूक उमेदवारांसाठी काही बंधने

जगातील मोठ्या लोकशाही देशात भारताची गणना होते. वयाची १८ वर्षे एवढ्याच किमान आधरावर आपण मतदार बनू शकतो. वयाच्या एकविशी नंतर कोणीही नगरिक निवडणुकीसाठी उमेदवार बनू शकतो. समंजस आणि सुशिक्षीत देशात एवढयाच आधारावर लोकशाही तगेलही कदाचित. पण निरक्षरता, अंधश्रद्धा, जातीपाती, भाषा आणि प्रांतवाद, लिंग व धर्मभेद, वंशवाद, वर्गवाद आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घराणेशाही ह्या सर्व रोगांनी जर्जर झालेल्या लोकशाहीला वाचवायचे असेल तर निवडणूक उमेदवारांसाठी काही किमान बंधने आणणे अत्यंत आवश्यक झाले आहे. काही बंधने मला सूचताहेत, तुम्हाला आणखी काही सुचत असतील तर अवश्य लिहा. आपण एकत्र करून ती पंतप्रधान, विरोधी पक्षनेते, निवडणूक आयोग ह्या सर्वांकडे ती पाठवून देउ. लोकशाही दृढ आणि मजबूत करण्यासाठी आपण विचारी झालेच पाहिजे.

१)ग्राम पंचायत/ नगर पालिका/महानगर पालिका पातळीवर २१ वर्षे ही किमान वयोमर्यादा योग्य आहे.
२)उमे्दवार किमान SSC असावा. दोन पेक्षा जास्त मुले नसावीत.
३)गुन्हेगार नसावा, कोर्टात पोलिस केस प्रलंबीत असल्यास निवडणुकीत उभे रहाता येउ नये.
४)पंचायत समिती/जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी त्याला ग्राम पंचायत सदस्यत्वाचा पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे
५)आमदारासाठी पाच वर्षाचा पंचायत समिती/जिल्हा परिषद सदस्यत्वाचा अनुभव अथवा महानगरपालिका सदस्यत्वाचा दहा वर्षे अनुभव आवश्यक आहे.
६)खासदारकी साठी विधान सभा/परिषद सदस्यत्वाचा पाच वर्षे अनुभव आवश्यक आहे.
७) पक्ष बदलल्यावर पाच वर्षे निवडणूक लढविता येणार नाही.
८) सर्वच सदस्य निवडून आल्यावर सदनाचे काम व समाजसेवा सोडून कोणताच व्यवसाय करणार नाहीत. शेती वा उद्योग असेल तर तो कुटूंबियानी सुरु ठेवावा. मात्र असे अर्थार्जन करणा-या सदस्यांना कोणतीच कर सवलत असू नये.
९) मंत्रीपद कोणत्याही एका सदनात दहा वर्षापेक्षा अधीक काळ भॊगता येउ नये.
१०)मुख्यमंत्री, पंतप्रधान, सभापती पदासाठी ही मर्यादा सर्व मिळून १५ वर्षाची असावी

वरील सूचनांवरून असे लक्षात येईल की साधारण सुशिक्षीत व आमदारकी साठी १० वर्षे अनुभव असलेले व खासदारकी साठी किमान १५ वर्षे अनुभव असलेले उमेदवारच पुढे जातील, त्यांचे जिवन नीतीमान असेल व राहील.समाज सेवा हा लोकप्रतिनीधींचा स्थाय़ी भाव बनेल.