भरपूर शिक्षण आणि अविरत संशोधन हिच राष्ट्रप्रगतीची गुरुकिल्ली आहे!
देश प्रगतीपथावर आहे म्हणजे काय? उत्तर एकच, कमी श्रमात कमी वेळात बुद्धीच्या वापराने वेगाने निर्मिती. मग ती कोणत्याही उत्पादनाची असो, उत्पादनातून पैसा, पैशातून सुबत्ता, सुबत्तेतून सम्रुद्धी॒, आणि सम्रृद्धी बरोबर शांती नांदली तरच ते राष्ट्र ख-या अर्थाने वैभवशाली बनते. हिन्दुस्थान ह्याच मार्गाने शतकानुशतके वैभव शाली परंपरा नांदवत होता. वैभवावर ईतरांची नजर पडणारच, गेली सातशे वर्षाच्या ह्या परकिय गुलामगिरीतून गेली साठ वर्षे आपण डोके काढून कोठे बाहेर बघू लागलो आहोत. मात्र जातियवाद, प्रांत वाद, भाषा वाद, धर्म वाद, वंशभेद, लिगंभेद आदी शत्रूंबरोबरिल आपली लढाई मात्र संपलेली नाही. ह्या लढाईतून निकोप स्पर्धा निर्माण झाली असती तरी चालले असते, पण ह्यातून फ़क्त निर्माण होत आहेत "वाद", एकमेकांना संपविण्याचॆ!प्रत्येक गोष्टीचे राजकारण! आणि अनितीच्या मार्गाने पैसा जमवून मिळवलेली सत्ता! ह्या सर्वांवर मात करुन प्रगती करावयाची असेल तर एकच उत्तर, ज्ञान आणि शक्ति ह्यांची एकत्र जोपासना! लोकमान्य टीळकांनी संगितलेली गुरुकिल्ली. ह्यात ज्ञानार्जनाच्या बरोबर संशोधन फार महत्वाचे आहे. संशोधनाने कित्येक रहस्य सहज गोष्टी होवुन जातात.कित्येकांचे श्रम वाचतात. कच्चा माल, वेळ,मेहनत व त्रास ह्या सर्वांना वाचवायचे असेल तर संशोधनाला पर्याय नाही.
ज्याला बुद्धीचे वरदान आहे, त्याने संशोधन केलेच पाहिजे! शाळातून अशा मुलांची निवड करुन फ्क्त डीग्रीच्या मागे न लागता,त्यांना सतत पुढचे शिक्षण लगेच दिले गेले पाहिजे. अमेरिकेत अशा विशेष प्रविण विद्यार्थ्याना शालेय शिक्षण लवकर संपवुन संशोधनाकडे जाण्याचा मार्ग खुला असतो. आपल्याकडिल चित्र मात्र वेगळे आहे. बुध्दीवान मुले व्यावसायीक शिक्षणाकडे वळताना दिसतात. चांगले व्यवसायिक शिक्षण म्हणजे भरपूर पैशांची परदेशी नोकरी!मुलगा अथवा मुलगी अमेरिकेत गेली म्हणजे इतिश्री झाली. हि संकल्पना वाढायला लागली आहे. मुले परदेशी शिकायला जातात ह्याचाच अर्थ,तेथील शिक्षण उच्च दर्जाचे आहे, जे आपल्याकडे नाही ते ज्ञान तेथे आहे. हे दुष्ट चक्र संपवायचे असेल तर मा अब्दुल कलामांचा मंत्र अमलात आणायलाच हवा. अविरत संशोधनाने आपला शिक्षण स्तर वाढवायलाच हवा. नालंदा तक्षशिला विद्यापीठांसारखी हजार विद्यापीठे येथे कार्यरत व्हायला हवित. दिडशे कोटीं जनतेच्या बुध्दीचे मालक आम्ही! ही शक्ति भांडणात नव्हे तर संशोधनात वापरायला हवी!
Sunday, February 10, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
सुंदर लेख आहे. मला पटतंय तुमच मत पण माझ्या अनुभवात आत्ताची कॊलेज ची म्हणजे अगदी नवीन पिढी .. म्हणजे मी फार aged नाहीय .. :P पण त्यांच्याकडून ..
" सावरकर कविता पण करत होते का? "
" लोकमान्य टिळक कोण होते सर? "
असले प्रश्न ऐकू येण्याची वेळ आली आहे आता ..
इतिहासच बदलला जात आहे. तिथे ऐतिहासिक व्यक्तिंचे विचार दूरच..
आपण एवढे स्वकेन्द्री आणि पोटार्थी झालो आहोत, की आपण ह्या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी कोण झिजले, कोणी त्याग केला, बलिदान केले ह्याचाही विसर पडू लागला आहे. नवी पिढी सख्ख्या आईबापाला ओळख दाखवेल कि नाही ह्याची कधी कधी शंका वाटते.संपर्काची साधने जितकी जवळ आली, तेवढाच माणूस दूरावू लागला आहे.जाऊ दे! कालाय तस्मै नम:।
मोहन,
धन्यवाद! तुमची इतकी सविस्तर प्रतिक्रीया बघून मला माझं नागपूरी अघळपघळ वर्णन अगदीच काही वाया गेलं नाही, असं वाटतं...
शाळेशी तुमचा संपर्क असतो असं म्हणालात म्हणून, मी सध्या एक पुस्तक वाचते आहे- “The Teaching Gap” त्यात जपान, जर्मनी आणि अमेरिकेतल्या शाळांमधे गणित कसं शिकवलं जातं त्याची चर्चा आहे- खरोखरी संस्कृती ही शिक्षणाचा पाया असते, हे त्यातून स्पष्ट होतं. आपल्या देशात दुर्दैवाने "ज्ञान" ब्राह्मण जातीने कडीकुलपात बंद करून ठेवलं, असा एकच पैलू प्रकर्षाने मांडला जातो. पण आपल्या संस्कृतीत ज्ञान हे "पवित्र" मानलं गेलं आहे, वंद्य मानलं गेलं आहे, हा त्याचा दुसरा पैलू लोक विसरतात. भारतीय संस्कृतीत शिक्षक/ गुरूला परमपूज्य स्थान देतात, त्यातून आपल्या सगळ्या शिक्षणसंस्थेचा पाया तयार झाला आहे, त्याच्या चांगल्या-वाईट परिणामांसकट. ह्याउलट अमेरिकेत, शिक्षक हा ज्ञानाचा उगम नाही, ही कल्पना रूढ आहे. वर्गातील चर्चांमधून ज्ञान निर्माण होतं, आणि त्यात विद्यार्थ्यांचा समसमान सहभाग असतो, हे मूलतत्त्व इथे अलिकडे सर्वमान्य झालंय.
त्या दृष्टीने विचार करता माझं शाळेचं वर्णन कधीच संपणार नाही, कारण शाळेतून खरं तर अमेरिकन संस्कृतीच दिसते आहे. मात्र तुमच्या प्रतिक्रीयेमुळे पुन्हा पुढचा भाग लिहायला हुरूप आला :)
"नवी पिढी सख्ख्या आईबापाला ओळख दाखवेल कि नाही ह्याची कधी कधी शंका वाटते"
सगळेच असे नाहीत.. ;)
Post a Comment