Friday, December 21, 2007

सप्रेम नमस्कार,
काही तरी दररोज वाचण्याची आवड भरपूर जणांसारखी मला सुद्धा आहे. दररोज काही तरी लिहिण्याचा प्रयत्न गेले कित्येक दिवस मनात आहे, पण आळसामुळे तसेच राहून जायचे. मात्र ब्लॉगच्या रुपाने आता जादुची पाटीच हातात मिळाल्याचा आनंद आहे, त्यामुळे मन मोकळे करण्याची संधी समोर कोणी नसेल तरी सोडणार नाही. तसे माझे विचार अगदी चार चौघांसारखे सरळ सोपे, धोपट मार्गाचे. त्याच विचारात एका नव्हे अनेक भारतियांचे मन दडलय, विचार प्रकट न करणा-या अनेकांचे विचार तसेच असावेत हे मला पदोपदी जाणवते म्हणूनच हा लेखन संपर्क!
आपल्या कोणत्याच कॄतिमूळे कॊणालाही त्रास होउ नये, हा स्वभाव जपण्याचा मी सदैव प्रयत्न करतो. पण ह्या गोष्टीचाही त्रास कोणाला होत असावा, हे बघण्याचे धाडस मी कधीच केले नाही. पण ह्या अती वेगाने धावणा-या जगात, कोणाला पर्वा असो अथवा नसो, आपले वागणे इतरांच्या त्रासाचे नसावे हे मात्र निश्चित. मी चहा पित नाही, ही अगदी साधी गोष्ट! ह्या नविन वर्षा पासून कॉफ़ी सुद्धा न पिण्याचा विचार आहे. पण असे करण्याने आपण कोणाकडे अगदी सहज गेलो तर अडचण तर होणार नाही ना! चहा कॉफ़ी ने सहज पाहुणचार साधता येतो, आता ह्याला काय द्यावे, हा प्रश्न आपण निर्माण तर करणार नाही ना? पण चहा कॉफ़ी न पिणारे असंख्य असतील, त्याचाशी संपर्क करून प्रतिक्रिया घ्यायला निश्चित आवडेल.

3 comments:

Tejaswini Lele said...

welcome to this blogger's world!
happy blogging!!!!

veerendra said...

haha ha .. ha vichar mi hi kela navata .. pan coffee sudhdha banda mhanje too much watta .. !

Sneha said...

:)