Saturday, September 25, 2010

नमस्कार,
भरपूर दिवसांनी ब्लॉगवर लिहिण्याचा योग आला आहे, दररोज इ मेल पाहिल्यावर कहीतरी लिहावे असे वाटते, पण कळलं तरी वळत नाही! आळसाचा प्रभाव, क्रियात्मकतेला पुढे येउच देत नाही, हेच खरे!!
भारतीय राजकारणातही अशीच मरगळ आलेय, आळस साचलाय आणि म्हणूनच शरद पवार, सुरेश कलमाडी, नारायण राणे या सारख्या नेत्यानी देखिल ताळतंत्र सोडलय, असच वाटतय!
महागाई वर कोणतेही उत्तर न सापडलेले पवार साहेब आता कर्जमाफ़ी नाही असे ऒरडू लागले आहेत, गेली कर्ज माफ़ी काय शेतक-याच्या भल्यासाठी दिली होतीत, निवडणूकीतील कार्यकर्त्यांची कर्जे शासनदरबारातून माफ़ करण्याचा डाव साधलात, कर्जमाफ़ीमुळे शेतक-याच्या आत्महत्येमधे कोणताही फरक पडलेला नाही. शेतक-यांच्या आत्म्हत्येमागे त्यांची कमी होणारी उत्पादकता हे महत्वाचे कारण आहे, आणि जोपर्यंत त्या गोष्टी कडे लक्ष दिले जात नाही, तो पर्यंत हे सरकारी खून सूरूच राहतील. शेतक-याला कर्जमाफ़ीचे सलाईन नको आहे, वेगेवेगळ्या सबसीडींचे गाजरही नको आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या, दलाल, अडते, साठेबाज,सरकारी खरेदी विक्री, निर्यातदार ह्यांचा वेठबिगारातून त्याला स्वच्छ कारभाराचा दिलासा दिलात तरी पुरे झाले. कृषी उत्पन्न बाजार समित्यामधे राजकिय पक्षाचे कार्यकर्ते फक्त वसूली करण्यासाठीच सहभाग घेतात, त्यांना वाटून दिलेली ती कुरणे आहेत. गेल्या वर्षी उसाचे गाळप झाल्यावर वाढलेले साखरेचे भाव, फक्त साखर कारखानदारांचा व संबंधीत राजकारण्यांनी परिस्थितीचा फायदा कसा उठविला जाउ शकतो, ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. १५रू किलोची साखर शेतक-याला वाढिव पैसा न देता चाळिस रूपये किलोने कशी विकली जाउ शकते, ही राजकारणी चाल सर्वसामान्य जनतेला समजणे कठीण आहे.
सुरेश कलमाडींनी राष्ट्रकूल स्पर्धा आयोजनेतील केलेला भ्रष्टाचार आता कॉंग्रेस नेत्यानाही किळसवाणा वाटू लागला आहे, आज मणिशंकर अय्यर ह्यांच्या मुलाखतीमध्ये हा भ्रष्टाचार साधरण पन्नास हजार कोटींचा असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. चार दिवसांनी बाबरी मशिद राम जन्मभूमी विवादातील पहिला न्यायालयातील निकाल अपेक्षित आहे. मात्र सरकारने अजूनही डोके ठिकाणावर असेल तर राष्ट्रकूल स्पर्धाच्या दरम्यान हा निकाल लाउ देउ नये. अर्थात सरकारला राष्ट्रकूल स्पर्धा आयोजनेतील केलेला भ्रष्टाचार सहज पचवायचा असेल तर राम जन्मभूमीचा निकाल जरूर लाऊन त्याला आंतरराष्ट्रिय मान्यता मिळवून द्यावी.
नारायण राण्यांनी आपल्या खूनी खासदार मूलाच्या पाठी उभे रहाताना केलेली कवायत केविलवाणी वाटली, राण्य़ांनी जन्मभर जे केले त्यांच्या घरात गांधीजींचा जन्म थोडाच होणार! कणकवली कुडाळ मधे दिवसा ढवळ्या केलेले व पचवलेले खून आता राजपूत्र करित आहे. ही लोकशाही आता भ्रष्टाचारामुळे कलंकीत झाली आहे. मी पुढे जाउन म्हणेन पूर्वी ह्या सर्व गोष्टींचा हक्क फक्त राजेशाहीला होता. एका राष्ट्रात एका राजघराण्यातील पाच पंचवीस नातेवाईक असा फायदा घेत असतीलही कदाचित! पण विक्रमादित्य, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त, हरिच्शंद्र, अशोक, शिवाजी महाराज, पेशवे, अहिल्याबाई अशा अनेक राजेशाहीत संस्कतीचा विकास झालेलाच दिसतो. चांगल्या राजेशाहीत झालेली प्रगती वादातीत उच्च दर्जाची होती. आज ओमान देशातील प्रगती ही चांगल्या राजेशाहीचा उत्तम नमुना आहे. टिळक आगरकर वादात आगरकर काही अर्थाने दूरदृष्टीचे होते असेच म्हणावे लागेल. लोकशाही मिळवण्याच्य़ा आधी जनता शहाणी करायला हवी हेच खरे! निरक्षर अज्ञानी जनतेच्या असाहय्यतेचा फायदा उठवून केलेले राज्य म्हणजे जंगल राजचा उत्तम नमुना ठरावा!