Wednesday, February 13, 2008

कोण मी? कोण मी !!

द्वैत मी, अद्वैत मी
कल्पित मी अन सत्त्य मी ॥
रुद्र मी, अंगार मी
शाक्त मी, संघर्ष मी ॥
सूप्त मी, स्वप्निल मी
बीज मी, अंकूर मी ॥
सूर मी, संगीत मी
नाद मी अन गंध मी ॥
कष्ट मी, उत्कर्ष मी
रुप मी, सौंदर्य मी ॥
दूर तरीही संग मी
वेदनेतही शांत मी ॥
काल मी, आज मी
भूत अन भवितव्य मी ॥
आदिअंतातीत मी
विजयातील यत्न मी
दिव्यतेचा भक्त मी

शोधतो स्वत:ला!

गर्दीतही मी एकटा, शोधतो स्वत:ला।
कोलाहलात नि:शब्द मी, ऐकतो स्वत:ला ॥
एकंतीही गर्तेत सा-या, हरवितो स्वत:ला ।
निसर्गातील प्राण मी, सजीवतो स्वत:ला ॥
हरवितो, शोधतो अन समजतो स्वत:ला ।
कोण मी, कोण मी, भांडावितो स्वत:ला॥

Sunday, February 10, 2008

भरपूर शिक्षण आणि अविरत संशोधन

भरपूर शिक्षण आणि अविरत संशोधन हिच राष्ट्रप्रगतीची गुरुकिल्ली आहे!
देश प्रगतीपथावर आहे म्हणजे काय? उत्तर एकच, कमी श्रमात कमी वेळात बुद्धीच्या वापराने वेगाने निर्मिती. मग ती कोणत्याही उत्पादनाची असो, उत्पादनातून पैसा, पैशातून सुबत्ता, सुबत्तेतून सम्रुद्धी॒, आणि सम्रृद्धी बरोबर शांती नांदली तरच ते राष्ट्र ख-या अर्थाने वैभवशाली बनते. हिन्दुस्थान ह्याच मार्गाने शतकानुशतके वैभव शाली परंपरा नांदवत होता. वैभवावर ईतरांची नजर पडणारच, गेली सातशे वर्षाच्या ह्या परकिय गुलामगिरीतून गेली साठ वर्षे आपण डोके काढून कोठे बाहेर बघू लागलो आहोत. मात्र जातियवाद, प्रांत वाद, भाषा वाद, धर्म वाद, वंशभेद, लिगंभेद आदी शत्रूंबरोबरिल आपली लढाई मात्र संपलेली नाही. ह्या लढाईतून निकोप स्पर्धा निर्माण झाली असती तरी चालले असते, पण ह्यातून फ़क्त निर्माण होत आहेत "वाद", एकमेकांना संपविण्याचॆ!प्रत्येक गोष्टीचे राजकारण! आणि अनितीच्या मार्गाने पैसा जमवून मिळवलेली सत्ता! ह्या सर्वांवर मात करुन प्रगती करावयाची असेल तर एकच उत्तर, ज्ञान आणि शक्ति ह्यांची एकत्र जोपासना! लोकमान्य टीळकांनी संगितलेली गुरुकिल्ली. ह्यात ज्ञानार्जनाच्या बरोबर संशोधन फार महत्वाचे आहे. संशोधनाने कित्येक रहस्य सहज गोष्टी होवुन जातात.कित्येकांचे श्रम वाचतात. कच्चा माल, वेळ,मेहनत व त्रास ह्या सर्वांना वाचवायचे असेल तर संशोधनाला पर्याय नाही.
ज्याला बुद्धीचे वरदान आहे, त्याने संशोधन केलेच पाहिजे! शाळातून अशा मुलांची निवड करुन फ्क्त डीग्रीच्या मागे न लागता,त्यांना सतत पुढचे शिक्षण लगेच दिले गेले पाहिजे. अमेरिकेत अशा विशेष प्रविण विद्यार्थ्याना शालेय शिक्षण लवकर संपवुन संशोधनाकडे जाण्याचा मार्ग खुला असतो. आपल्याकडिल चित्र मात्र वेगळे आहे. बुध्दीवान मुले व्यावसायीक शिक्षणाकडे वळताना दिसतात. चांगले व्यवसायिक शिक्षण म्हणजे भरपूर पैशांची परदेशी नोकरी!मुलगा अथवा मुलगी अमेरिकेत गेली म्हणजे इतिश्री झाली. हि संकल्पना वाढायला लागली आहे. मुले परदेशी शिकायला जातात ह्याचाच अर्थ,तेथील शिक्षण उच्च दर्जाचे आहे, जे आपल्याकडे नाही ते ज्ञान तेथे आहे. हे दुष्ट चक्र संपवायचे असेल तर मा अब्दुल कलामांचा मंत्र अमलात आणायलाच हवा. अविरत संशोधनाने आपला शिक्षण स्तर वाढवायलाच हवा. नालंदा तक्षशिला विद्यापीठांसारखी हजार विद्यापीठे येथे कार्यरत व्हायला हवित. दिडशे कोटीं जनतेच्या बुध्दीचे मालक आम्ही! ही शक्ति भांडणात नव्हे तर संशोधनात वापरायला हवी!

Friday, February 1, 2008

महा भ्रष्ट राजकारणी आणि संधिसाधू राजकारण

टी चंद्रशेखर ह्या कर्तव्यदक्ष सनदी अधिका-याचा राजिनामा अखेर मंजूर होणार असे संकेत कालच्या मा मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतुन दिसून येत आहे. सनदी अधिकारी प्रामाणीक, प्रजा हित दक्ष असेल, निर्णय क्षम योग्यतेचा असेल तर सरकारी तारु तो कसे हाकलु शकतो,हे तिनइकर,प्रधान,शेषन,किरण बेदी, टी चंद्रशेखर सारख्या अनेक दिग्गजांनी दखवीले आहे. पण भ्रष्ट राजकारण्यांना आज हवे आहेत, हुजरे सनदी अधिकारी! जे राजकारण्यांच्या स्वार्थाचा रथ हाकलतील, मंत्र्यांच्या स्वार्थासाठी सर्व शासकिय शक्ति पणाला लावतील.
पोलिस दलातील भरतीच्या कथा, बदल्यांची बोली, मोक्याच्या जागांवरिल दावेदारी ह्यांचे म्हणे आता स्टान्डर्डायझेशन झाले आहे.महसूल विभागातील गमती तर आणखी चविष्ट! वनीकरणासाठी म्हणून स्वजनांच्या ट्रस्ट ला शहरातील मोक्याची जागा अगदी एक रुपया भुई भाड्याने ९९९ वर्षे द्यायची, आणि वर्षभरात तेथे इमारतींचे रान निर्माण करायचे, अरबो रुपयांची संपत्ती देशात बनवून स्वीश ब्यांकेत ठेवायची. महसूल मंत्र्यांच्या पत्नीला असाच एक कर्नाळा अभयारण्यातला वीस एकराचा भुखंड तातडीने मिळतो आहे. झट मंगनी पट शादी सारखे, आज जमिन मिळावी म्हणून अर्ज, कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी, वन विभाग ह्यांच्याकडुन एका दिवसात अनुमोदन, आणि केन्द्रिय मंत्र्याकडे दोन दिवसात फ़ाईल सुपुर्द, आणि कदाचित आठवड्या भरात कर्नाळा अभयारण्यात आणखी एक बिबट्या स्वताचा पेट्रोल पंप, होटेल, बार आणि असे अनेक वनीकरणाचे उद्योग सुरु होतील.असे सनदी अधिकारी आपली स्वत:ची मोठी माया निर्माण करतात, आणि सरकारी रथ मंत्र्यांच्या सोइने हाकत रहातात, त्यांच्यासाठी प्रजा ही य:किन्चित असते.
टी चंन्द्रशेखर कोठेही जाओत, ते सनदी अधिका-यांना मार्गदर्शक ठरतील. किरण बेदी यांनी सेफ़र इन्डिया चे काम सुरु केले आहे त्यासाठी शुभेच्छा!